नाशकात कंपनीतून केमिकल बनविण्याच्या फॉर्म्युल्याची चोरी
नाशिक, 04 सप्टेंबर (हिं.स.)। कंपनीच्या लॅबमधून गोपनीय नोटबुकमधील केमिकल बनविण्याचा फॉर्म्युला चोरी करून त्या प्रॉडक्टचे उत्पादन करणाऱ्या एका सायंटिस्टसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विलास प्रेमराज डागा (रा. कामटवाडा, अंबिकान
नाशकात कंपनीतून केमिकल बनविण्याच्या फॉर्म्युल्याची चोरी


नाशिक, 04 सप्टेंबर (हिं.स.)। कंपनीच्या लॅबमधून गोपनीय नोटबुकमधील केमिकल बनविण्याचा फॉर्म्युला चोरी करून त्या प्रॉडक्टचे उत्पादन करणाऱ्या एका सायंटिस्टसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत विलास प्रेमराज डागा (रा. कामटवाडा, अंबिकानगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे, की आरोपी सिनिअर सायंटिस्ट डॉ. गणेश मोरे, लॅब के मिस्ट अभिजित भदाणे, ज्युनिअर लॅब केमिस्ट वैभव खैरनार, संतोष जाधव व सेल्स एक्झिक्युटिव्ह वैभव दरेकर यांनी संगनमताने विश्वासघात करून डिसेंबर २०२५ ते दि. २७ ऑगस्ट २०२६ दरम्यान फिर्यादीच्या अंबड एमआयडीसीतील ए. एम. लुब्रिकंट्स अॅण्ड कोटिंग प्रा. लि. च्या लॅबमधून गोपनीय नोटबुकमधील केमिकल बनविण्याचा फॉर्म्युला चोरी केला. ही माहिती गणेश मोरे, संतोष जाधव व वैभव दरेकर यांना हस्तांतरित करून त्या माहितीचा वापर करून त्यापासून फिर्यादी यांच्या कंपनीसारख्या पी. यू. फुटवेअरशी संबंधित मोल्ड रिलिज एजंट या प्रॉडक्टचे स्वतःच्या फायद्यासाठी उत्पादन करून ते बाजारात विकण्यास पाठवून कंपनीचे नुकसान केले. या प्रकरणी एम. आय. डी. सी. पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मुगले करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande