
सोलापूर, 04 सप्टेंबर (हिं.स.)।
सिंधी समाजाचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक लालचंद वाधवानी यांच्यावर भरदिवसा धारदार शस्त्राने खुनी हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून, संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोर हातात धारदार शस्त्र घेऊन आला आणि सर्वांसमक्ष वाधवानी यांच्यावर वार केले. हल्ल्यानंतर संबंधित आरोपी धारदार शस्त्रासह दुचाकीवरून घटनास्थळावरून पसार झाला.
हल्ल्यात जखमी झालेल्या लालचंद वाधवानी यांच्यावर आसरा चौक परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेप्रकरणी माजी नगरसेवक अरुण भालेराव यांनी संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, हल्ल्याचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने पोलिसांना आरोपीचा शोध घेण्यासाठी महत्त्वाचा पुरावा मिळण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड