
छत्रपती संभाजीनगर, 08 सप्टेंबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत महामार्गालगतची व्यावसायिक अतिक्रमणे हटविण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. ५२ वरील धुळे–सोलापूर तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५२ वरील छत्रपती संभाजीनगर–पैठण मार्गालगत ही कारवाई करण्यात येत आहे.
आतापर्यंत ४७० पक्की दुकाने व ढाबे आणि २५५ कच्च्या शेड, टपऱ्या व व्यावसायिक फलक हटविण्यात आले आहेत. पोलीस बंदोबस्तात विहित प्रक्रियेनुसार ही कारवाई सुरू आहे. ही मोहीम पुढील १५ दिवस कन्नड तसेच पैठणपर्यंत सुरू राहणार आहे. नागरिक व व्यावसायिकांनी महामार्गालगतची आपली अतिक्रमणे स्वतःहून काढून घेऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis