नाशिक, 11 ऑक्टोबर, (हिं.स.)। सातपपूर परीसरात पाईपलाईन रोडजवळील णेश नगर रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ आज सकाळी भीषण अपघात घडला. ट्रक आणि दुचाकीच्या धडकेत 8 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला. मृत नविका नेरकर (वय 8) स्विमिंग करून आजी सोबत घरी जात असताना हा प्रकार घडला. या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून, नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे
आजी सोबत दुचाकीवरून जात असलेल्या नविका नेरकर यांना मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. धडकेनंतर ती रस्त्यावर पडली आणि ट्रकचं चाक थेट तिच्या डोक्यावरून गेले. या भीषण अपघातात नविकाचा जागीच मृत्यू झाला. . घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जमावाला शांत करत ट्रक जप्त केला असून ट्रक ड्रायव्हर फरार झालेला आहे बारा चाकी टाटा ट्रक असून एम. एच. १७ बी. डी ५००५ हा नंबर असून त्याच परिसरात मॉल असल्यामुळे परिसरात नेहमी ट्राफिक जाम होते. वेळोवेळी महानगरपालिकेला तसेच संबंधित प्रशासनाला परिसरातील नागरिकांच्या वतीने स्पीड बेकर टाकण्यासाठी अनेक वेळा निवेदन देखील दिली आहे मात्र या निवेदनाची प्रशासनाच्या वतीने कुठल्याही प्रकारची नोंद किंवा दक्षता घेतली जात नाही या संपूर्ण घटनेला मनपा प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे महेंद्र शिंदे यांनी केला आहे
ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून संबंधित फरार ड्रायव्हरचा शोध घेतला जात आहे.
चौकट
शहरातील अवजड वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर
दरम्यान या अपघातामुळे पुन्हा एकदा नाशिक शहरातून होणारी अवजड वाहतुकीचा प्रश्न समोर आहे. सातत्याने शहरातील मखमलाबाद पेठ रोड यासह सिडको इंदिरानगर या भागातून जी अवजड वाहतूक होते ती धोकादायक आहे सातत्याने अशी वाहतूक बंद करण्याची मागणी नागरिकांकडून वारंवार होते परंतु मनपा व पोलीस प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने अशा स्वरूपाच्या घटना शहरांमध्ये काही कालावधीनंतर घडतच असतात.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV