लातूर, 11 ऑक्टोबर, (हिं.स.)।लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराचे नगरपरिषदेमार्फत सुशोभिकरण करण्यात येत आहे. या कामाची सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आज पाहणी केली. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार संजय बनसोडे, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, समाज कल्याण सहायक आयुक्त यादवराव गायकवाड, मुख्याधिकारी संतोष लोमटे यांच्यासह नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक व नागरिक यावेळी उपस्थित होते.
अहमदपूर नगरपरिषदेमार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात करण्यात येत असलेल्या सुशोभीकरण कामांमध्ये भारतीय संविधानाच्या उद्देशिका, अशोकस्तंभ, संसद भवनाची प्रतिकृती आदी कामांचा समावेश आहे. या कामांची सामाजिक न्याय मंत्री श्री. शिरसाट यांनी यावेळी पाहणी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis