अकोला, 11 ऑक्टोबर (हिं.स.)।
ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजना तसेच खांबोरा व ६०गावे प्रादेशिक पाणी पुरवठा तातडीने पुर्ण करा .....योजनांच्या आढावा बैठकीत आमदार रणधीर सावरकरांचे मजिप्रा च्या अधिकारी यांना निर्देश,
ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजना वेळेमध्ये तातडीने पूर्ण करा तसेच यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे ज्या ठिकाणी पाणी पुरवठा योजना नुकसान झालेले आहे त्याची दुरुस्ती सुद्धा तातडीने करा अशा सूचना आमदार रणधीर सावरकर यांनी मजीप्राच्या पाणीपुरवठा योजनेच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या वाढती लोकसंख्या आणि जुनी झालेली पाणी वितरण व्यवस्था लक्षात घेता शासनाच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याच्या योजना नव्याने बांधकामाधीन आहे खारपाणपट्ट्यातील खांबोरा ६० गावे , ग्रामीण पाणी पुरवठा योजना व योजनेतील वितरण व्यवस्थेमध्ये नवीन पाईप लाईन तसेच उंच टाक्या व सुधारित वितरण प्रणाली टाकण्याचे काम सुरू आहे या योजनेच्या कामाच्या प्रगती बाबत चा आढावा मजीप्राचे अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयात आज आमदार सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला बैठकीच्या सुरुवातीला आमदार सावरकरांनी विचारणा केली की यापूर्वीच्या बैठकीमध्ये देण्यात आलेल्या सूचनाबाबत काय कारवाई केली याबाबतची माहिती घेतली तसेच बऱ्याच ठिकाणी पाण्याचा डिस्चार्ज वाढल्यामुळे वितरण व्यवस्थेवर एअर हॉल बसविणे गरजेचे आहे असे असतांना अंदाजपत्रकात याबाबत पुरेशी तरतूद केली नसल्याने आमदार सावरकरांनी नाराजी व्यक्त केली तसेच मागील बैठकीत पळसो झोन मधील वितरण व्यवस्था चाचणी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या त्याचे सुद्धा पालन झाल्याचे दिसून न आल्याने आमदार सावरकरांनी अधिकाऱ्यांप्रती नाराजी व्यक्त केली. चाचोंडी गावामध्ये उंच टाक्यांची बांधकाम तसेच पाईपलाईनचे जाळे टाकण्याकरिता खोदून ठेवलेले रस्ते दुरुस्त करण्यात आले नाहीत याबाबत चाचोंडी येथील ग्रामस्थ बैठकीमध्ये उपस्थित झाले असता सदरचे रस्ते तातडीने दुरुस्त करा तसेच खोदल्याच्या रस्त्यांच्या दुरुस्तीकरिता अंदाजपत्रकात तरतूद नाही त्यामुळे अशा चुकीच्या अंदाजपत्रकाबाबत दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना आमदार सावरकरांनी दिल्या.
बैठकी करिता अलीयाबाद, चाचोंडी येथील ग्रामस्थ अकोला भाजपाचे शहर प्रमुख जयंत मसणे विवेकजी भरणे आदि पदाधिकारी उपस्थित होते
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे