लातूर, 11 ऑक्टोबर (हिं.स.)।
रेणापूर नगरपंचायतीसह जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजपाला शंभर टक्के यश मिळावे यासाठी प्रयत्नशील रहावे असे आ.रमेशआप्पा कराड यांनी आवाहन केले आहे.
विधानसभा निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली, जिकरीचे प्रयत्न केले. मतदारानी मोठा आशीर्वाद दिला यामुळेच लातूर ग्रामीण मतदार संघात भाजपाच्या विजयाचा नवा इतिहास घडला. येणाऱ्या काळात होणाऱ्या रेणापूर नगरपंचायतीसह जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत लातूर ग्रामीण मतदार संघात भाजपाला शंभर टक्के यश मिळावे यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे असे आवाहन भाजपा नेते आमदार श्री रमेशआप्पा कराड यांनी केले.
येणाऱ्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक अनुषंगाने लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील भाजपाच्या प्रमुख पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधीची बैठक भाजपा नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत लातूर येथील भाजपाच्या संवाद कार्यालयात शनिवारी झाली.
याप्रसंगी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ भोसले, हनुमंतबापू नागटिळक, चिटणीस दशरथ सरवदे, लातूर संगायो समिती अध्यक्ष बन्सी भिसे, रेणापूरचे अध्यक्ष सतीश आंबेकर, मंडळ अध्यक्ष महेंद्र गोडभरले, रेणापूरचे माजी नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे यांच्यासह इतर अनेकांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
येत्या नोव्हेंबर महिन्यात नगरपालिका, नगरपंचायतीच्या आणि डिसेंबर महिन्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होतील असे सांगून यावेळी आ रमेशआप्पा कराड म्हणाले की, मागील वेळी रेणापूर नगरपंचायत आणि रेणापूर पंचायत समिती भाजपाच्या ताब्यात आली होती तर जिल्हा परिषदेच्या 11 पैकी 6 जागेवर यश मिळाले होते.
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis