रत्नागिरी, 11 ऑक्टोबर, (हिं. स.) : मंडणगड येथे दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन रविवारी दि. १२ ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई मंडणगडला येणार आहेत.
रविवारी सकाळी ११ वाजता सर्वोच्च उद्घाटन समारंभ होईल. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर भूषवितील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग व मराठी भाषा तथा पालकमंत्री उदय सामंत, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक आणि न्यायमूर्ती माधव जामदार, राज्यमंत्री योगेश कदमदेखील या समारंभाला उपस्थित राहणार आहेत.न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यानंतर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल येथे समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी