नाशिक, 11 ऑक्टोबर (हिं.स.) - बांधकामाच्या साईटवरील सुपरवायझरने विविध साईटवर महिलेवर चार वर्षे लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत पीडितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की आरोपी प्रमोद पृथ्वीराज प्रसाद (रा. जाधव संकुल) याने पीडितेचा विश्वास संपादन करीत तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. नंतर त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर मखमलाबाद रोडवरील हनुमानवाडीत असलेल्या प्रभात एम्पायर बांधकामाच्या
साईटवर, उंटवाडी येथील बांधकामाच्या साईटच्या पत्र्याच्या रूममध्ये, केवल पार्कमध्ये, सिडकोतील हिंदी माध्यमिक शाळेजवळ, अशा विविध ठिकाणी नेत तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. हा सर्व प्रकार ऑक्टोबर २०२१ ते जुलै २०२५ दरम्यान घडला. यादरम्यान पीडितेने त्याला लग्नाबाबत विचारले असता त्याने तिला नकार दिल्याने आपली फसवणूक झाल्याचे पीडितेच्या लक्षात आले. पीडितेच्या फिर्यादीवरून प्रमोद प्रसादविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV