नाशिक, 11 ऑक्टोबर, (हिं.स.)। येथील प्रसिद्ध युरोलॉजिस्ट डॉ. राजन पटणी यांना द युरोलाॅजिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या वेस्ट झोनच्या वतीने त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल सर्व्हिस अॅवाॅर्ड २०२५ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
शालेय शिक्षण येवला येथे झालेल्या पटणी यांनी मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेज आणि जे जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स येथून एमबीबीएस, एमएस (जनरल सर्जरी) आणि एमसीएच (युरॉलॉजी) केले. १९८९ साली त्यांनी नाशिकमध्ये प्रॅक्टिस सुरू केली. त्यावेळी ते उत्तर महाराष्ट्रातील पहिले युरॉलॉजिस्ट होते. नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात त्यांनी अनेक वैद्यकीय शिबिरे घेतली. त्यांच्या पुढाकाराने मविप्र समाजाचे वैद्यकीय महाविद्यालय, शिर्डी येथील साईबाबा हॉस्पिटल आणि नाशिकमधील संदर्भ सेवा रुगणालय येथे युरॉलॉजी विभाग सुरू केला. संदर्भसेवा रुग्णालयात त्यांनी १२०० हून जास्त युरॉलॉजी शस्रक्रिया केल्या. त्यांच्या या कामाची दखल घेऊन युरॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या वेस्ट झोनच्या वतीने सर्व्हिस अॅवॉर्ड देऊन गौरविण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV