परभणीत राष्ट्रवादी युवक काँग्रेस जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन व मोफत नेत्र तपासणी शिबिर
परभणी, 11 ऑक्टोबर (हिं.स.)। राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर जिल्हा तर्फे आयोजित भव्य जनसंपर्क कार्यालय उद्घाटन सोहळा आणि मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. हा उपक्रम रोजी राष्ट्रवादी युवक का
राष्ट्रवादी युवक काँग्रेस जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन व मोफत नेत्र तपासणी शिबिर


परभणी, 11 ऑक्टोबर (हिं.स.)। राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर जिल्हा तर्फे आयोजित भव्य जनसंपर्क कार्यालय उद्घाटन सोहळा आणि मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

हा उपक्रम रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष सचिन पाचपुंजे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रथम महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आले. उद्घाटनानंतर मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने या उपक्रमाचा लाभ घेतला. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande