लायन्स क्लबकडून दापोली बसस्थानकासाठी कचरा डबे
रत्नागिरी, 11 ऑक्टोबर, (हिं. स.) : दापोली शहरात स्वच्छता राखण्यासाठी आणि प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दापोली लायन्स क्लबतर्फे बसस्थानकात कचऱ्याचे डबे बसवण्यात आले. या उपक्रमामुळे बसस्थानक परिसर स्वच्छ राहण्यास मदत होणार असून, नागरिकांच्
लायन्स क्लबकडून दापोली बसस्थानकासाठी कचरा डबे


रत्नागिरी, 11 ऑक्टोबर, (हिं. स.) : दापोली शहरात स्वच्छता राखण्यासाठी आणि प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दापोली लायन्स क्लबतर्फे बसस्थानकात कचऱ्याचे डबे बसवण्यात आले. या उपक्रमामुळे बसस्थानक परिसर स्वच्छ राहण्यास मदत होणार असून, नागरिकांच्या गैरसोयींनाही दिलासा मिळणार आहे.

या उपक्रमाचे उद्घाटन लायन्स क्लबचे अध्यक्ष अतुल मेहता यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुजय मेहता, महेंद्र जैन, अरुण गांधी, प्रसाद मेहता, मनोहर जैन, प्रशांत पुसाळकर, राज्य परिवहन महामंडळाचे राजेंद्र उबाळे तसेच भाग्यश्री प्रभुणे, हर्षल नाफडे, मटन संसारे, मुनाफ राजापकर आदी मान्यवर उपस्थित होते.

लायन्स क्लबच्या या उपक्रमामुळे 'दापोली स्वच्छ शहर मोहिमेला' चालना मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी या उपक्रमाचे स्वागत करत लायन्स क्लबचे कौतुक केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande