नाशिक, 11 ऑक्टोबर (हिं.स.)
- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे निर्णय घेण्यासंदर्भामध्ये क्रीडा मंत्री माणिक कोकाटे यांना पक्षाने संपर्क नेता म्हणून नियुक्त केलेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पक्षामध्ये ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे एकाकी पडल्याचे समोर येत आहे. या सर्व विषयावरती भुजबळ समर्थकांकडून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही.
मागील काही दिवसापासून सत्ताधारी पक्षामध्ये असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षांमध्ये सर्वच काही अलबेला आहे. असं काही नाही काही दिवसापूर्वी बेताल वक्तव्यामुळे कृषी मंत्री पदावरून दूर करून क्रीडामंत्री पदावरती समाधान मानावे लागलेले माणिक कोकाटे यांच्यामुळे पक्ष अडचणीत आलेला होता. तर आत्ता राज्याचे सहकार मंत्री पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त विधाने पुन्हा एकदा पक्ष अडचणीत आलेला आहे. हे सर्व घडत असताना सातत्याने सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षांमध्ये नेहमीच काही ना काही तरी वादग्रस्त सुरूच असतं असंच आता पुन्हा एकदा समोर आलेला आहे.
राज्यातील ज्येष्ठ नेते आणि समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावरती पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून अन्याय होताना दिसत आहे अलीकडेच होऊ घातलेल्या निवडणुका आणि जिल्ह्यातील संपर्क नेत्यांचे नियुक्ती करण्यात आली त्यामध्ये छगन भुजबळ यांना पक्षाने दूर ठेवलेले आहे नासिक धुळे जळगाव या तीन जिल्ह्यांची जबाबदारी विद्यमान क्रीडामंत्री माणिक कोकाटे यांच्यावरती देण्यात आलेली आहे. यापूर्वी देखील छगन भुजबळ हे ओबीसी प्रश्नावरून पक्षांमध्ये एकाकी पडलेले होते आता पुन्हा त्यांना संपर्क नेता या पदावरून दूर ठेवून पक्षाने त्यांच्यावरती अन्याय केला आहे आणि पुन्हा एकदा भुजबळ पक्षामध्ये एकटे पडले आहेत. त्यामुळे आता पुढे काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असून या सर्व विषयावरती भुजबळ समर्थकांकडून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV