नाशिकला 'लेपर्ड सफारी' प्रकल्प राबवा, खा. राजाभाऊ वाजेंचे केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांना पत्र
नाशिक, 11 ऑक्टोबर (हिं.स.)। जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून वाढत्या बिबट्या-मानव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. या संवेदनशील मुद्द्याची गंभीर दखल घेत खासदार राजाभाऊ वाजे यांनी केंद्र सरकारकडे थेट हस्तक्षे
नाशिकला 'लेपर्ड सफारी' प्रकल्प राबवा, खा. राजाभाऊ वाजेंचे केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांना पत्र


नाशिक, 11 ऑक्टोबर (हिं.स.)।

जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून वाढत्या बिबट्या-मानव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. या संवेदनशील मुद्द्याची गंभीर दखल घेत खासदार राजाभाऊ वाजे यांनी केंद्र सरकारकडे थेट हस्तक्षेपाची मागणी केली असून, नाशिकसाठी स्वतंत्र 'लेपर्ड सफारी अँड कंझर्वेशन प्रोजेक्ट' मंजूर करावा, अशी मागणी पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांना दिलेल्या पत्राद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, गेल्या पाच वर्षांत (२०२१-२०२५) बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे ३५ हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून ६२ हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. मानवहानी बरोबरच पाळीव जनावरांचे व शेतीचे मोठे नुकसान झाले असून अधिकृत ₹६.१० कोटींची भरपाई वितरित करण्यात आली आहे. अलीकडेच वडनेर गेट परिसरात दोन वर्षीय बालकाच्या मृत्यूच्या घटनेने जनतेत संतापाची लाट उसळली होती.

देवळालीगाव, पिंपळगाव खांब, वडनेर गेट परिसरात नागरिकांनी आंदोलन करत वनविभागाच्या अपुऱ्या पिंजऱ्यांविषयी, उशिरा प्रतिसाद देणाऱ्या पथकांविषयी आणि निष्क्रय यंत्रणेव नाराजी व्यक्त केली होती. एप्रिल ते जून २०२५ या काळात वनारवाडी परिसराव तब्बल तीन बिबटे पकडण्यात आले, ह घटनांची गंभीरता दर्शवते, असेही वाज यांनी नमूद केले आहे.

खासदार वाजे यांनी पत्रात पुढे नमून केले आहे की, पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील 'लेपर्ड सफारी प्रोजेक्ट', तसेच सातारातील 'माणिकडोह रेस्क्यू सेंटर आणि राजस्थानमधील 'जयपूर लेपड रिझव्ह' ही यशस्वी उदाहरणे आहेत. अश प्रकारचा समर्पित लेपर्ड सफारी आणि संवर्धन प्रकल्प नाशिकमध्येही उभारल्यास पर्यावरणीय संतुलन, पर्यावरण शिक्षण स्थानिक रोजगारनिर्मिती आणि पर्यटनाला चालना मिळू शकते.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande