गुणनियंत्रणासाठी स्वतंत्र अधिकारी
नाशिक, 11 ऑक्टोबर (हिं.स.)।
नाशिक व त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी शासनाने स्थापन केलेल्या प्राधिकरणामध्ये एकूण 76 ही भरण्यात येणार आहे याबाबतचा आदेश शासनाने शुक्रवारी उशिरा काढला आहे.
नाशिक मध्ये होत असलेल्या कुंभमेळ्यासाठी आता प्राधिकरण स्थापन करण्यात आल्यानंतर यासाठी स्वतंत्र मनुष्यबळाची निर्मिती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे त्यासाठी एकूण 76 पदांना मंजुरी देण्यात आली आहे त्यापैकी 52 पदे हे नियमित सेवा भरतीची असतील तर 24 पदे ही तात्पुरती बाह्यसेवेने घेतली जाणार आहे याबाबतचा शासन आदेश हा शुक्रवारी सायंकाळी उशिरा राज्य सरकारने काढला आहे.
या आदेशामध्ये म्हटल्याप्रमाणे कुंभमेळा प्राधिकरणामध्ये भारतीय प्रशासन सेवेतील आयुक्त हे पद असणार आहे त्याचबरोबर त्यांच्यासाठी लघुलेखात लिपिक असं स्वतंत्र वर्ग असणार आहे तर सनियंत्रण अधिकारी यासाठी भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे त्यांच्या बरोबरीला मुख्य कार्यकारी अधिकारी उपजिल्हाधिकारी या स्तरावर असेल मुख्य कार्यकारी अधिकारी तहसीलदार तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन हे कार्यालयीन अधीक्षक स्तरावरील पद असणार आहे.
या बरोबरीने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला असून त्या ठिकाणी आयपीएस अधिकारी किंवा अप्पर अधीक्षक किंवा पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती होणार आहे त्यांच्याबरोबर हिला पोलीस निरीक्षक व स्वतंत्र लिपीक यांची नियुक्ती करण्यात येणार आहे निधी नियोजनासाठी म्हणून जिल्हा नियोजन अधिकारी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे त्यांच्याबरोबर हिला लेखा अधिकारी उपलेखाधिकारी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
कुंभमेळा मध्ये सर्वात वादाचा विषय नेहमी ठरत असलेल्या गुण नियंत्रणा संदर्भामध्ये शासनाने यावेळी मात्र ठोस भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. कुंभमेळ्यात होणाऱ्या कामांची गुण नियंत्रण चांगले असावे दर्जेदार कामे व्हावे यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाव्याने आतापर्यंत दर्जेदार काम होतील चांगली काम होतील असा दावा केला होता आणि त्याचाच भाग या आदेशामध्ये दिसून येत असून गुणनियंत्रण कक्ष हा स्वतंत्र स्थापन करण्यात आलेला आहे त्यासाठी अधीक्षक अभियंता कार्यकारी अभियंता संशोधन अधिकारी उप अभियंता लिपिक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर कुंभमेळ्याची प्रसिद्धी व्हावी यासाठी म्हणून स्वतंत्र म्हणजेच जनसंपर्कसाठी स्वतंत्र यंत्रणा उभी केलेली आहे त्यामध्ये माहिती अधिकारी कंत्राटी जनसंपर्क व इतर काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे याशिवाय इतर पदं नियुक्त केले जाणार आहे त्यामध्ये सल्लागार किंवा विषय तज्ञ शिपाई भाडेतत्त्वावरती गाडी यांचा समावेश आहे. हे सर्व करत असताना सिंहस्थ कुंभमेळाचे कार्यालय कुठे असेल याचा मात्र आदेशामध्ये उल्लेख नाही त्यामुळे यापूर्वी कुंभमेळा आयुक्ता असलेले प्रवीण गेडाम यांनी जिल्हा परिषद येथे जे कार्यालय सुरू केले होते तेच कायम राहणार असल्याचे यातून स्पष्ट झालेले आहे
.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV