रत्नागिरी, 11 ऑक्टोबर, (हिं. स.) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा द्वितीय वर्ष एम. बी. बी. एस. निकाल शंभर टक्के लागला आहे.
नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे गेल्या ऑगस्टमध्ये महिन्यात घेण्यात आलेल्या द्वितीय वर्ष एम. बी. बी. एस. परीक्षेमध्ये रत्नागिरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने उत्तुंग यश मिळविले आहे. या संस्थेचा निकाल महाराष्ट्रातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सर्वात जास्त म्हणजेच १०० टक्के लागला आहे. गेल्या वर्षी प्रथम वर्ष एम. बी. बी. एस. परीक्षेमध्ये महाविद्यालयाचा निकाल राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सर्वांत जास्त म्हणजेच ९९ टक्के इतका लागला होता.
महाविद्यालयाच्या यशाबद्दल पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत यांनी अधिष्ठाता, डॉ. जयप्रकाश रामानंद तसेच सर्व अध्यापक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांची विषयवार संख्या-औषधशास्त्र ८, सूक्ष्मजीवशास्त्र ७ व विकृतीशास्त्र ५ अशी आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी