रत्नागिरी : लोटे एमआयडीसीतील कारखान्यात ग्राइंडरच्या ठिणगीने कामगार भाजून जखमी
रत्नागिरी, 11 ऑक्टोबर, (हिं. स.) : खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील ‘योजना ऑरगॅनिक्स’ या रासायनिक कंपनीत ग्राइंडरच्या ठिणगीमुळे लागलेल्या आगीत एक कामगार गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी दुपारी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कामगार ग्
रत्नागिरी : लोटे एमआयडीसीतील कारखान्यात ग्राइंडरच्या ठिणगीने कामगार भाजून जखमी


रत्नागिरी, 11 ऑक्टोबर, (हिं. स.) : खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील ‘योजना ऑरगॅनिक्स’ या रासायनिक कंपनीत ग्राइंडरच्या ठिणगीमुळे लागलेल्या आगीत एक कामगार गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी दुपारी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कामगार ग्राइंडरच्या साहाय्याने नटबोल्ट कापण्याचे काम करत असताना ठिणग्या उडून जवळच्या ज्वलनशील पदार्थांना आग लागली. अचानक भडका उडाल्याने कामगाराचे हात, पाय आणि चेहरा गंभीर स्वरूपात भाजला. कंपनी व्यवस्थापनाने तातडीने त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून, पुढील उपचारांसाठी त्याला चिपळूण येथील लाइफ केअर रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.या प्रकरणाची औद्योगिक सुरक्षा विभागाकडून तसेच पोलिसांकडून सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक कामगार संघटनांकडून जोर धरू लागली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande