धाराशिव : बंडगर, राठोड यांचा शिवसेना उबाठा गटात प्रवेश
धाराशिव, 12 ऑक्टोबर (हिं.स.)। येथील स्थानिक राजकारणात मोठी घडामोड झाली असून, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सुधीर बंडगर आणि युवराज राठोड यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे धाराश
अ


धाराशिव, 12 ऑक्टोबर (हिं.स.)। येथील स्थानिक राजकारणात मोठी घडामोड झाली असून, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सुधीर बंडगर आणि युवराज राठोड यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे धाराशिवमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आमदार कैलास पाटील यांनी सुधीर बंडगर आणि युवराज राठोड यांचे पक्षात स्वागत करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले, बंडगर आणि राठोड यांच्या प्रवेशामुळे पक्षाला निश्चितपणे बळकटी मिळेल. हे दोन्ही नेते जनतेच्या हितासाठी आणि पक्ष वाढीसाठी भरीव कार्य करतील, असा आम्हाला विश्वास आहे.

या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर, शहरप्रमुख सोमनाथ गुरव, जिल्हा समन्वयक दिनेश बंडगर यांच्यासह शिवसेनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बंडगर आणि राठोड यांच्या पक्षबदलामुळे ऐन नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्का बसल्याचे मानले जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande