धाराशिव, 12 ऑक्टोबर (हिं.स.)। अतिवृष्टीमुळे नुकसानीला सामोरे जाणाऱ्या परांडा तालुक्यातील पूरग्रस्त बांधवांसाठी मायमराठी फाउंडेशन (नवी मुंबई) तर्फे मानवीतेचा उत्कृष्ट आदर्श घालून देण्यात आला आहे.शेळगाव, देऊळगाव, बंगालवाडी, भोत्रा (ता. परांडा, जि. धाराशिव) या गावांमध्ये 600 जीवनावश्यक वस्तूंच्या किट्स तसेच जिल्हा परिषद शाळांमध्ये 250 शालेय साहित्य किट्स वाटप करण्यात आले.
मंगेश मिस्कीन (संस्थापक अध्यक्ष), अनिल शिंदे (उपाध्यक्ष), आदी सदस्य यांनी सहभाग घेतला.धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्तांना दिलेली ही मदत म्हणजे “माणुसकीचं खरं दर्शन” आहे. अशी प्रतिक्रिया खासदार ओम राजे निंबाळकर यांनी दिली आहे.
----------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis