पंतप्रधानांच्या कृषी योजना कृषी क्षेत्राच्या आत्मनिर्भरतेसाठी गेमचेंजर ठरणार - राधाकिशन पठाडे
छत्रपती संभाजीनगर, 12 ऑक्टोबर (हिं.स.)पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या व्हिजनमधून अन्नदात्याच्या कल्याणासाठी आणि देशाच्या आत्मनिर्भरतेसाठी दोन महत्वाच्या योजनांची घोषणा करण्यात आली. अशी प्रतिक्रिया छत्रपती संभाजीनगर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचे स
अ


छत्रपती संभाजीनगर, 12 ऑक्टोबर (हिं.स.)पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या व्हिजनमधून अन्नदात्याच्या कल्याणासाठी आणि देशाच्या आत्मनिर्भरतेसाठी दोन महत्वाच्या योजनांची घोषणा करण्यात आली. अशी प्रतिक्रिया छत्रपती संभाजीनगर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राधाकिशन पठाडे यांनी दिली आहे.या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण छत्रपती संभाजी नगर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये करण्यात आले.

पीएम धन धान्य कृषि योजना आणि दलहन आत्मनिर्भरता मिशन या योजनांमुळे आता देशातील शेतकऱ्यांचे नशीब पालटणार आहे. मोदी सरकार या योजनांवर ३५,००० कोटींहून अधिक खर्च करणार आहे. देशातील कृषी क्षेत्राच्या आत्मनिर्भरतेसाठी या योजना गेमचेंजर ठरणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande