अमरावती : डॉक्टर कॉलनीत वादग्रस्त सात मजली इमारत; अध्यक्ष-सचिवांवर पद दुरुपयोगाचा आरोप
अमरावती, 13 ऑक्टोबर (हिं.स.) | तपोवन गेटच्या आत असलेल्या डॉक्टर कॉलनी येथील राजीव को. ऑप. हाउसिंग सोसायटी येथे मोठा गैरव्यवहार उघड झाला आहे. सोसायटीचेच अध्यक्ष डॉ. हरिष गुल्हाने आणि त्यांचा मुलगा डॉ. हितेश गुल्हाने,सचिव गोवर्धन वानखडे यांनी सोसायट
डॉक्टर कॉलनीत खळबळ!   सोसायटीच्या नियमांना तिलांजली देत दोन प्लॉटवर उभारली जात आहे सात मजली इमारत  अध्यक्ष, सचिवांनी पदाचा दुरुपयोग केल्याचा सदस्यांचा आरोप


अमरावती, 13 ऑक्टोबर (हिं.स.) | तपोवन गेटच्या आत असलेल्या डॉक्टर कॉलनी येथील राजीव को. ऑप. हाउसिंग सोसायटी येथे मोठा गैरव्यवहार उघड झाला आहे. सोसायटीचेच अध्यक्ष डॉ. हरिष गुल्हाने आणि त्यांचा मुलगा डॉ. हितेश गुल्हाने,सचिव गोवर्धन वानखडे यांनी सोसायटीच्या उपविधींचा भंग करून व पदाचा गैरवापर करून सभासदांना कोणतीही माहिती न देता स्वतःच्या मालकीचे दोन प्लॉट आदित्य इंजिनिअर्स अँड कॉन्ट्रॅक्टर या बांधकाम फर्मला विक्री करून त्यावर अवैधरित्या सात मजली इमारत बांधकाम करण्याचे षडयंत्र सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २९ मार्च २०२४ रोजी डॉ. गुल्हाने यांनी त्यांच्या मालकीच्या दोन प्लॉटचा व्यवहार आदित्य इंजिनिअर्स अँड कॉन्ट्रॅक्टर या फर्मशी केला. या फर्मचे भागीदार गोपाल बोंदराजी इंगळे, अक्षय बाबराव इंगळे आणि गोकुलदास राऊत असून, संबंधित जागेवर सात मजली फ्लॅट सिस्टीमचे बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरू केले आहे.परंतु सोसायटीच्या उपविधीनुसार, राजीव को. ऑप. हाउसिंग सोसायटी ही केवळ निवासी सोसायटी असून, सोसायटीच्या हद्दीत वाणिज्य उपयोग अथवा फ्लॅट सिस्टीम प्रकारचे बांधकाम करण्यास स्पष्ट मनाई आहे. तरीही अध्यक्षांनीच नियमांची पायमल्ली करत हा व्यवहार केल्याने सदस्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर सोसायटीच्या सदस्यांनी सहकार न्यायालय, अमरावती येथे दावा दाखल केला आहे. त्यानुसार, न्यायालयाने आदित्य इंजिनिअर्स अँड कॉन्ट्रॅक्टर यांना आदेश देऊन संबधीत प्लॉट वरील सुरू असलेले बांधकाम का थांबवू नये?” याबाबत लेखी उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, प्लॉट क्रमांक १ व २ वरील सात मजली इमारतीचे बांधकाम कायदेशीर वादात अडकलेले असल्याने, नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी या फ्लॅट किंवा दुकानांशी संबंधित कोणताही खरेदी-विक्री अथवा भाडे व्यवहार करण्यापूर्वी संपूर्ण कागदपत्रांची व कायदेशीर स्थितीची खात्री करूनच व्यवहार करावा असे आवाहन सोसायटीचे सदस्य साधना देशमुख, मुरलीधर घाटोळ, कृष्णाभाऊ चाटघोडे, अ‍ॅड. एस. टी. खंडारे संजय देऊळकर आदींनी संयुक्तरीत्या केले आहे.

----------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande