मुंबई, १३ ऑक्टोबर (हिं.स.) : येथील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे आयोजित करण्यात आलेल्या 'चलो भारत वॉकथॉन २०२५' स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला असून तब्बल ६,५०० स्पर्धक सहभागी झाले होते. निरोगी मजबूत आणि एकसंध भारत या थीम वर आधारित ही स्पर्धा प्लेफ्री स्पोर्ट्स इंडिया आणि बजाज जनरल इन्शुरन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. यावेळी सहभागी स्पर्धकांनी 'चलो दिल से, हर कदम स्वस्थ भारत' हा प्रेरणादायी संदेश मुंबईकरांना दिला.
या वॉकथॉनमध्ये उत्साही तरुण, ज्येष्ठ नागरिक आणि कॉर्पोरेट टीम्स एकत्र आल्या, ज्यामुळे आरोग्य, एकता आणि सामुदायिक भावनेचा संगम यावेळी पहायला मिळाला.
यावेळी प्लेफ्री स्पोर्ट्स इंडियाचे संचालक सितांशु झा म्हणाले की, 'चलो भारत वॉकथॉन हीजागरूक जीवनशैलीचा उत्सव आहे. आज उचललेले प्रत्येक पाऊल आरोग्य, सलोखा आणि आनंदासाठी भारताची सामूहिक वचनबद्धता दर्शवते. या चळवळीचा देशभरात विस्तार करत, आता आमचे पुढील पाऊल चलो भारत वॉकेथॉनला बंगळूर, कोलकाता आणि दिल्लीमध्ये आयोजन करणे आहे.'सह-प्रायोजक भागीदार म्हणून, बजाज जनरल इन्शुरन्सने केवळ निरोगी राहण्याच्या मिशनला बळ दिले नाही, तर सर्व सहभागींचा दिवसासाठी विमा देखील उतरवला.
यावेळी बजाज जनरल इन्शुरन्सचे असोसिएट सीनियर व्हाईस प्रेसिडेंट आणि मार्केटिंग प्रमुख विक्रमजीत भयाना म्हणाले की, 'बजाज जनरल इन्शुरन्समध्ये, आमचा विश्वास आहे की खरे संरक्षण पॉलिसींपेक्षा अधिक आहे. ते आपल्या समुदायांचे आरोग्य आणि आत्म्याचे रक्षण करण्याबद्दल आहे. 'चलो भारत'ला पाठिंबा देणे हे भारताला अधिक मजबूत, निरोगी आणि अधिक आत्मविश्वासपूर्ण जीवन जगण्यासाठी सक्षम बनवण्याच्या आमच्या दृष्टीचे प्रतिबिंब आहे.'
दरम्यान या वॉकेथॉनमध्ये स्क्वाडमाईंड,.एनर्झाल, टाटा सोलफुल, डान्स विथ चिराग, स्टार प्रोटेक्शन, स्पिनर, इंडिपेंडन्स वॉटर, डेकॅथलॉन, फिनिक्स मार्केटसिटी, रोलिंग स्टोरीज, वन सपोर्ट, मॅंगो स्टेशनरी, युनिमो, आणि लव्ह माय इंडिया यांचा समावेश आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी