धाराशिव जिल्हा नियोजन समितीची बैठक १५ ऑक्टोबरला
छत्रपती संभाजीनगर, 13 ऑक्टोबर (हिं.स.)। धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक येत्या १५ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात होणाऱ्या या बैठक
अ


छत्रपती संभाजीनगर, 13 ऑक्टोबर (हिं.स.)। धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक येत्या १५ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात होणाऱ्या या बैठकीत जिल्ह्यातील विविध विकास योजनांच्या खर्चाचा आढावा घेतला जाणार आहे.

बुधवारी, १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता ही बैठक सुरू होईल. या बैठकीच्या अजेंड्यावर अनेक महत्त्वाचे विषय आहेत. यामध्ये १ मे रोजी झालेल्या मागील सभेच्या इतिवृत्ताला आणि त्यावर झालेल्या कार्यवाहीला मंजुरी देणे, हा प्रमुख विषय असेल.

त्याचबरोबर, जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना, आणि आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासींसाठी उपयोजना) सन २०२५-२६ अंतर्गत सप्टेंबर अखेरपर्यंत झालेल्या खर्चाचा सविस्तर आढावा पालकमंत्री घेणार आहेत. या प्रमुख विषयांव्यतिरिक्त, पालकमंत्र्यांच्या परवानगीने आयत्या वेळी येणाऱ्या इतर महत्त्वाच्या विषयांवरही या बैठकीत चर्चा केली जाणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande