मराठवाड्यात पुन्हा वादळी पावसाचे संकट
छत्रपती संभाजीनगर, 13 ऑक्टोबर (हिं.स.)। मराठवाड्यात पुन्हा वादळी पावसाचे संकट ओढवले आहे.15 ऑक्टोबरपासून पुन्हा पावसाची शक्यता असल्यामुळे शेतकरी अधिक चिंतित होणार आहे. नैऋत्य मान्सूनने राज्यातून जरी निरोप घेतला असला तरी, येत्या काळात महाराष्ट्रात प
मराठवाड्यात पुन्हा वादळी पावसाचे संकट


छत्रपती संभाजीनगर, 13 ऑक्टोबर (हिं.स.)। मराठवाड्यात पुन्हा वादळी पावसाचे संकट ओढवले आहे.15 ऑक्टोबरपासून पुन्हा पावसाची शक्यता असल्यामुळे शेतकरी अधिक चिंतित होणार आहे.

नैऋत्य मान्सूनने राज्यातून जरी निरोप घेतला असला तरी, येत्या काळात महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाळी हवामान अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, १५ ऑक्टोबरपासून राज्याच्या काही भागांमध्ये वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून, शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

गेले काही दिवस राज्यातील हवामान कोरडे असले तरी, १५ ऑक्टोबरपासून त्यात मोठा बदल अपेक्षित आहे. अंदाजानुसार, १५ ते १८ ऑक्टोबर या कालावधीत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात दुपारनंतर ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. दिवसा हवामान ढगाळ राहील आणि दुपारनंतर पावसाच्या सरी कोसळतील, असे चित्र अपेक्षित आहे.

या वादळी पावसाचा सर्वाधिक जोर आणि प्रमाण विदर्भ आणि मराठवाड्यात राहण्याची शक्यता आहे. या भागांतील अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तुलनेत खान्देश आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.

ऐन काढणीच्या हंगामात पावसाचा अंदाज आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर, कृषी विभागाने शेतकऱ्यांना हवामानातील बदलांनुसार आपल्या कामांचे नियोजन करण्याचा सल्ला दिला आहे. विशेषतः ज्या शेतकऱ्यांची पिके काढणीला आली आहेत किंवा काढणी करून शेतातच आहेत, त्यांनी ती वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठिकाणी ठेवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande