पाटणा, 13 ऑक्टोबर (हिं.स.) १५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या २०२५-२६ रणजी ट्रॉफी हंगामाच्या पहिल्या दोन फेऱ्यांसाठी वैभव सूर्यवंशीला बिहारचा उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. संघाचे नेतृत्व साकिबुल गनी करणार आहे. वयाच्या १४ व्या वर्षी भारताच्या १९ वर्षांखालील संघाकडून खेळताना, राजस्थान रॉयल्सच्या या तरुण फलंदाजाने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये शतके झळकावली आहेत. इंग्लंडविरुद्धच्या पाच युवा एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने ७१.०० च्या सरासरीने आणि १७४.०२ च्या स्ट्राईक रेटने ३५५ धावा केल्या आहेत. आयपीएल २०२५ मध्येही त्याला अतुलनीय यश मिळाले होेते.
वैभव सूर्यवंशी टी२० आणि इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात शतक झळकावणारा सर्वात तरुण फलंदाज आहे. १४ व्या वर्षी सूर्यवंशीने गुजरात टायटन्स विरुद्ध ३५ चेंडूत शतक झळकावले होते. वैभवला आपल्या शेवटच्या युवा कसोटीत फक्त २० आणि ० धावा काढता आल्या होत्या. असे असले तरी, सूर्यवंशीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ११३ धावा केल्या. आता तो २०२५/२६ रणजी करंडकात बिहारसाठी चांगली कामगिरी करून साऱ्यांचेच लक्ष पुन्हा एकदा वेधून घेण्यास सज्ज झाला आहे.
पुढील वर्षी झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे होणाऱ्या १९ वर्षांखालील विश्वचषकासाठी भारतीय संघाचा भाग होण्यासाठी सूर्यवंशी शर्यतीत असल्याने तो संपूर्ण हंगामात बिहारकडून खेळण्याची शक्यता कमी आहे.
बिहारचा रणजी करंडक संघ : साकीबुल गनी (कर्णधार), वैभव सूर्यवंशी (उपकर्णधार), पीयूष कुमार सिंग, भास्कर दुबे, अर्णव किशोर, आयुष लोहारुका, बिपिन सौरभ, आमोद यादव, नवाज खान, साकिब हुसेन, राघवेंद्र प्रताप सिंग, सचिन कुमार सिंग, सचिन कुमार सिंग, सचिन कुमार सिंग, सचिन कुमार सिंग.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे