भारतीय संघ दिल्ली कसोटी जिंकण्यपासून 58 धावा दूर
नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर (हिं.स.)वेस्ट इंडिजविरुद्ध विजयासाठी १२१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, भारताने चौथ्या दिवसाचा खेळ १ बाद ६३ धावांपर्यंत मजल मारली आहे. भारतीय संघ दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप देण्यापासून केवळ ५
भारतीय क्रिकेट संघ


नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर (हिं.स.)वेस्ट इंडिजविरुद्ध विजयासाठी १२१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, भारताने चौथ्या दिवसाचा खेळ १ बाद ६३ धावांपर्यंत मजल मारली आहे. भारतीय संघ दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप देण्यापासून केवळ ५८ धावा दूर आहे. भारताने दुसऱ्या डावात १ बाद ६३ धावा केल्या आहेत. साई सुधरसन सध्या ३० आणि केएल राहुल २५ धावांवर नाबाद आहेत. यशस्वी जयस्वाल 8 धावा करून बाद झाला. भारतासमोर १२१ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

फॉलो-ऑन खेळताना वेस्ट इंडिजने त्यांच्या फलंदाजांच्या बळावर दुसऱ्या डावात ३९० धावा केल्या. भारताने त्यांचा पहिला डाव ५ बाद ५१८ धावांवर घोषित केला होता. तर वेस्ट इंडिजचा पहिला डाव २४८ धावांवर संपुष्टात आला. आणि भारताने २७० धावांची आघाडी घेतली होती. अशा परिस्थितीत भारताने फॉलो-ऑन लागू करण्याचा निर्णय घेतला आणि प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजच्या संघाने ३९० धावा केल्या. वेस्ट इंडिजची एकूण आघाडी १२० धावांवर होती आणि भारताला विजयासाठी १२१ धावांचे लक्ष्य मिळाले.

सोमवारी वेस्ट इंडिजने २ बाद १७३ धावांवर खेळ सुरू केला आणि २१७ धावांमध्ये आपल्या उर्वरित 8 विकेट्स गमावल्या. विंडीजकडून जॉन कॅम्पबेल आणि शाई होपने झुंजार शतके झळकावली. कॅम्पबेलने ११५ आणि होपने १०३ धावा केल्या. कर्णधार रोस्टन चेसने ४०, तर जस्टिन ग्रीव्हजने नाबाद ५० धावा केल्या. ग्रीव्हजचे हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पहिले अर्धशतक होते.

तेजनारायण चंद्रपॉलने १० धावा आणि अ‍ॅलिक अथानाझेने सात धावा केल्या. टेव्हलिन इमलॅकने १२ धावा आणि वॉरिकनने तीन धावा केल्या. अँडरसन फिलिप दोन धावा काढून बाद झाला. खारी पियरे आपले खाते उघडू शकला नाही. भारताकडून कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी तीन, तर सिराजने दोन विकेट्ल घेतल्या. जडेजा आणि सुंदर यांनी प्रत्येकी एकेक विकेट घेतली.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande