डेन्मार्क ओपनमध्ये सात्विक-चिराग जोडीच्या कामगिरीकडे लक्ष
नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर (हिं.स.)मंगळवारपासून सुरू होणाऱ्या 950,000 डॉलर्सच्या डेन्मार्क ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही भारतीय पुरुष दुहेरी जोडी भारताचे नेतृत्व करेल. आणि आपल्या कामगिरीचे विजेतेपदात रूपांत
सात्विक आणि चिराग


नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर (हिं.स.)मंगळवारपासून सुरू होणाऱ्या 950,000 डॉलर्सच्या डेन्मार्क ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही भारतीय पुरुष दुहेरी जोडी भारताचे नेतृत्व करेल. आणि आपल्या कामगिरीचे विजेतेपदात रूपांतर करण्याचा प्रयत्न करेल. सहाव्या मानांकित जोडीचा पहिल्या सामन्यात स्कॉटलंडच्या क्रिस्टोफर ग्रिमली आणि मॅथ्यू ग्रिमलीशी होणार आहे.

सात्विक आणि चिराग या हंगामात भारताचे सर्वोत्तम प्रदर्शन करणारे बॅडमिंटनपटू ठरले आहेत. पण त्यांना अद्याप एकही विजेतेपद जिंकता आलेले नाही. ते हाँगकाँग आणि चीन मास्टर्स सुपर 750 स्पर्धांच्या अंतिम फेरीत पोहोचले होते. या जोडीने पॅरिसमधील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत त्यांचे दुसरे कांस्यपदक जिंकले आणि इतर अनेक स्पर्धांच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

पुरुष एकेरीत जागतिक क्रमवारीत 28 व्या क्रमांकावर असलेला आयुष शेट्टी पहिल्या फेरीत फ्रान्सच्या टोमा ज्युनियर पोपोव्हशी सामना करेल. आणखी एक भारतीय जागतिक क्रमवारीत 19 व्या क्रमांकावर असलेला लक्ष्य सेन, आयर्लंडच्या न्हाट न्गुयेनशी सामना करणार आहे.

महिला एकेरीत, युवा अनमोल खरबचा सामना पहिल्या फेरीत इंडोनेशियाच्या सातव्या मानांकित पुत्री कुसुमा वर्दानीशी होईल. पुरुष दुहेरीत, पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय आणि साई प्रतीक यांचा सामना पहिल्या फेरीत चिनी तैपेईच्या लिऊ कुआंग हेंग आणि यांग पो हान यांच्याशी होईल.

महिला दुहेरीत, रुतापर्णा पांडा आणि श्वेतापर्णा पांडा यांचा सामना स्कॉटलंडच्या जूली मॅकफर्सन आणि सियारा टोरेन्सशी होईल, तर कविप्रिया सेल्वम आणि सिमरन सिंघी यांचा सामना बल्गेरियाच्या गॅब्रिएला आणि स्टेफनी स्टोएवाशी होईल. मिश्र दुहेरीत, मोहित आणि लक्षिता जगलान, रोहन कपूर आणि रुत्विका शिवानी आणि ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो यांचा सामना आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न असेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande