जोश्ना चिनप्पाने जपान ओपन २०२५ स्क्वॅश स्पर्धेचे विजेतेपद पटकावले
टोकियो, 13 ऑक्टोबर (हिं.स.)भारताची दोन वेळा आशियाई विजेती जोश्ना चिनप्पाने पुन्हा एकदा दमदार कामगिरी केली. योकोहामा येथे झालेल्या जपान ओपन २०२५ स्क्वॅश स्पर्धेत तिने महिला एकेरीचे जेतेपद पटकावले. महिला एकेरीच्या क्रमवारीत ११७ व्या क्रमांकावर आणि जप
जोश्ना चिन्नप्पा


टोकियो, 13 ऑक्टोबर (हिं.स.)भारताची दोन वेळा आशियाई विजेती जोश्ना चिनप्पाने पुन्हा एकदा दमदार कामगिरी केली. योकोहामा येथे झालेल्या जपान ओपन २०२५ स्क्वॅश स्पर्धेत तिने महिला एकेरीचे जेतेपद पटकावले. महिला एकेरीच्या क्रमवारीत ११७ व्या क्रमांकावर आणि जपानमध्ये बिगरमानांकित भारतीय स्क्वॅश खेळाडूने पीएसए चॅलेंजर स्पर्धेत तिसरी मानांकित जागतिक क्रमवारीत ५३ व्या क्रमांकावर असलेल्या इजिप्तच्या हया अलीचा ११-५, ११-९, ६-११, ११-८ असा पराभव करून विजयाला गवसणी घातली.

जोश्ना चिनप्पाची हया अलीसोबतचा हा दुसरा सामना होता. या वर्षी बर्म्युडा ओपनच्या दुसऱ्या फेरीत या दोन्ही स्क्वॅश खेळाडू एकमेकांसमोर आल्या होत्या. जोश्नाने हा सामना ११-८, १०-१२, ५-११, ११-९, ११-८ असा गमावला होचा.जपान ओपनमधील जोशनाचे हे तिच्या कारकिर्दीतील ११ वा पीएसए विजेतेपद होते. माजी जागतिक क्रमवारीत १० व्या क्रमांकाची स्क्वॅशपटू, जोशनाने २०२३ च्या हांगझोऊ येथील आशियाई क्रीडा स्पर्धेनंतर गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर पुनरागमन केले आहे. ती आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या कांस्यपदक विजेत्या महिला संघाचाही भाग होती.या वर्षाच्या सुरुवातीला, जोशनाने जूनमध्ये आशियाई चॅम्पियनशिपमध्ये युवा स्टार अनाहत सिंगसह महिला दुहेरीचे विजेतेपद जिंकले. ती इंडियन ओपनच्या उपांत्य फेरीतही पोहोचली, जिथे ती अनाहतकडून पराभूत झाली आणि अनाहत विजेती ठरली.

यापूर्वी जपान ओपनमध्ये, जोशनाने उपांत्यपूर्व फेरीत दुसऱ्या मानांकित इजिप्तच्या नार्डिन गरासचा ११-८, १५-१३, ११-९ असा पराभव केला. त्यानंतर तिने उपांत्य फेरीत इजिप्तच्या चौथ्या मानांकित राणा इस्माइलचा ११-७, ११-१, ११-५ असा पराभव केला. तिने दुसऱ्या फेरीत पाचव्या मानांकित फ्रान्सच्या लॉरेंट बाल्टेनचा ११-७, ११-४, ११-९ असा पराभव केला आणि तिच्या पहिल्या सामन्यात मलेशियाच्या एनरी गोहचा ११-६, ११-६, ११-६ असा पराभव केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande