चाहूल दिवाळीची .... शहरात रंगबिरंगी आकाशकंदील,पणत्या विक्रीस
अमरावती, 14 ऑक्टोबर (हिं.स.)विजयादशमी झाल्यानंतर ओढ असते ती दिवाळीची. दिवाळीचा सण अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत विविध प्रकारच्या वस्तू दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी बाजारपेठेतील रेलचेल वाढल्या
चाहूल दिवाळीची .... शहरात रंगबिरंगी आकाशकंदील,पणत्या विक्रीस


अमरावती, 14 ऑक्टोबर (हिं.स.)विजयादशमी झाल्यानंतर ओढ असते ती दिवाळीची. दिवाळीचा सण अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत विविध प्रकारच्या वस्तू दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी बाजारपेठेतील रेलचेल वाढल्याचे दिसून येत आहे. बाजारपेठ विविध आकर्षक वस्तूंनी उजळून निघाली आहे. लक्षवेधी आकाश कंदिलांचा लखलखाट बाजारपेठेत वाढल्याचे दिसून येत आहे.

दिवाळीनिमित्त बाजारपेठ सजल्याचे दिसून येत आहे.दिव्यांच्या माळा लागल्या आहेत. हे आकाश कंदील ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. अंबादेवी मंदिर रस्ता, मोची गल्छी परिसर, इतवारा, राजकमल, गाडगे नगर तसेच शहरातील अन्य ठिकाणी रस्त्याच्या कडेला दुकाने सजली आहेत. आज बाजारपेठेत साधारणतः २० रुपयांपासून ते ५ हजार रुपयांपर्यंतचे आकाश कंदील आले आहेत. ते अर्ध्या फुटापासून तीन फुटापर्यंत आहेत. काही आकाश कंदील मोठ्या आकाराचेही आहेत. वेगवेगळ्या रंगाच्या दोऱ्या, विविध आकाराचे मणी, काचेचे तुकडे, नानाविध रंगाचा वापर करून त्यावर आकर्षक कलाकुसर करण्यात आली आहे.

काही आकाश कंदिलांवर देव-देवतांची छायाचित्रे तर काही आकाश कंदिलांवर विविध प्रकारचे छायाचित्रेही लावण्यात आली आहेत. आकर्षक कलाकुसर करण्यात आलेल्या आकाश कंदिलांना ग्राहकांची अधिक पसंती आहे. बाजारपेठेत इको फ्रेंडली आकाश कंदीलही आहेत. कापडी, कागदी आणि ज्युटपासून बनवलेले आकाश कंदील बाजारात मोठ्या प्रमाणावर आहेत. यंदाच्या दिवाळीतही पावसाची शक्यता असल्यामुळे कापडी, ज्युटपासून निर्मित आकाश कंदिलांना अधिक मागणी दिसून येत आहे.

छोटे कंदील : छोट्या कंदिलांमध्ये नेहमीच विविध प्रकार पाहायला मिळत असतात. विशेष म्हणजे कागदी आणि प्लास्टिकमध्ये छोटे कंदील मोठ्या प्रमाणात बनवले जातात. त्यानुसार, बाजारात कागदी आणि प्लास्टिकचे कंदील विक्रीसाठी आले आहेत.

बाजारपेठेत दाखल झालेल्या आकर्षक कंदिलांचे प्रकार आणि किंमत

कागदी आकाश कंदिलाची किंमत ४०० पासून ८०० रुपयांपर्यंत आहे. याआधी हे कंदील २०० ते ५०० रुपयांपर्यंत मिळत होते. कापडी आकाश कंदिलाची किंमत १०० पासून १२०० रुपयांपर्यंत आहे.याआधी हे कंदील ५०० ते ९०० रुपयांपर्यंत मिळत होते. साडीचा वापर करून तयार केलेले कंदील १२०० ते १४०० रुपयांपर्यंत आहेत. याआधी हे कंदील ७०० ते १०० रुपयांपर्यंत मिळत होते.प्लास्टिक आणि विविध वस्तूंचा वापरकरून बनवलेले कंदील याआधी ५०० रुपयांपर्यंत मिळत होते. यंदा या कंदिलांच्या किमती वाढल्या असून ७०० ते ८०० रुपये झाली आहे.

--------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande