चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
बीजिंग, 14 ऑक्टोबर (हिं.स.)।चीनच्या झिनजियांग प्रांतात मंगळवारी (दि.१४) भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता 4.2 रिश्टर स्केलवर नोंदवली गेली आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) नुसार, या भूकंपाचे केंद्र अक्षांश: 41.65° उत्तर आण
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप


बीजिंग, 14 ऑक्टोबर (हिं.स.)।चीनच्या झिनजियांग प्रांतात मंगळवारी (दि.१४) भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता 4.2 रिश्टर स्केलवर नोंदवली गेली आहे.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) नुसार, या भूकंपाचे केंद्र अक्षांश: 41.65° उत्तर आणि देशांतर: 81.14° पूर्व या स्थानी होते. या भूकंपाची खोली जमिनीपासून फक्त 10 किलोमीटर होती. या भूकंपामध्ये कोणतेही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही. प्रशासन परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे आणि पुढील घडामोडींवर नजर ठेवली जात आहे. स्थानिक रहिवाशांना सतर्क राहण्याचा आणि आफ्टरशॉक्स वेळी सुरक्षिततेसंबंधीच्या नियमांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

यापूर्वी 9 ऑक्टोबर रोजी चीनच्या दक्षिण-पश्चिम सिचुआन प्रांतात देखील भूकंप झाला होता, ज्याची तीव्रता 5.4 इतकी होती. चीन अर्थक्वेक नेटवर्क सेंटर नुसार, हा भूकंप गांजी तिबेटी स्वायत्त प्रीफेक्चरच्या शिनलॉन्ग काउंटीमध्ये झाला होता. भूकंपाचे केंद्र कंगदिंग शहरापासून सुमारे 216 किलोमीटर दूर होते आणि त्याची खोली देखील 10 किलोमीटर होती.

दरम्यान, भारतातही लडाखमधील लेह परिसरात सोमवारी रात्री ९:२८ वाजता 4.5 तीव्रतेचा भूकंप नोंदवला गेला. एनसीएसनुसार, भूकंपाचे केंद्र लेहपासून सुमारे 284 किलोमीटर उत्तर-पश्चिमेला, करगिलच्या जवळ होते. त्याचे अक्षांश 36.68°N आणि देशांतर 74.39°E होते. या भूकंपाची गहिराई देखील फक्त 10 किलोमीटर होती. या भूकंपाचे धक्के स्थानिक स्तरावर जाणवले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande