श्री संत गाडगे बाबा सामाजिक कार्य पुरस्कार नामांकनाकरीता आवेदनपत्र आमंत्रित
अमरावती, 14 ऑक्टोबर (हिं.स.)संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातर्फे आणि दानदाते स्व. द.ना. उपाख्य बबनराव दादा मेटकर यांच्याकडून प्राप्त झालेल्या दाननिधीमधून कै. नागोरावजी जयरामजी मेटकर स्मृतिप्रित्यर्थ ‘श्री संत गाडगे बाबा सामाजिक कार्य पुरस्कार 202
कै. नागोरावजी जयरामजी मेटकर स्मृतिप्रित्यर्थ श्री संत गाडगे बाबा सामाजिक कार्य पुरस्कार नामांकनाकरीता आवेदनपत्र आमंत्रित


अमरावती, 14 ऑक्टोबर (हिं.स.)संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातर्फे आणि दानदाते स्व. द.ना. उपाख्य बबनराव दादा मेटकर यांच्याकडून प्राप्त झालेल्या दाननिधीमधून कै. नागोरावजी जयरामजी मेटकर स्मृतिप्रित्यर्थ ‘श्री संत गाडगे बाबा सामाजिक कार्य पुरस्कार 2025’ प्रदान करावयाचा आहे. यावर्षी व्यक्ती गटात एक व संस्था गटात एक, अशा एकूण दोन पुरस्काराकरीता स्वतंत्र आवेदनपत्र मागविण्यात येत आहे. श्री संत गाडगे बाबा सामाजिक कार्य पुरस्कार महाराष्ट्र राज्यातील श्री संत गाडगे बाबांच्या कृतीशील विचाराशी तसेच दशसूत्रीशी बांधीलकी असणारी व्यक्ती किंवा संस्थेला देण्यात येतो. पुरस्कारासाठी एखाद्या व्यक्तीने वा संस्थेने स्वत:हून नाव सादर करणे किंवा दुस-या कोण्या एखाद्या व्यक्तीची वा संस्थेची पुरस्कारासाठी शिफारस करणे किंवा नाव सूचविणे दोन्ही पध्दतीने नामांकन अर्ज स्वीकारण्यात येतील. संस्था किंवा व्यक्तीगत आवेदकांनी नामांकन आवेदन पत्रासोबत आपल्या जीवनाचा सविस्तर आलेख आणि पुरस्काराकरीता निश्चित केलेल्या निकषानुसार तसेच गाडगे बाबांच्या दशसूत्रीनुसार सामाजिक क्षेत्रात कार्य केल्याचा पुरावा पाठविणे आवश्यक आहे. श्री संत गाडगे बाबा सामाजिक कार्य पुरस्कारासाठी आवेदकांना दि. 10 नोव्हेंबर, 2025 पूर्वी विहीत प्रपत्रातील नामांकन आवेदनपत्र पाच प्रतीत ‘‘कुलसचिव, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती 444602’’ या पत्त्यावर पाठवावयाची आहेत. नामांकन आवेदनपत्र पाठवितांना लिफाप्यावर “ कै. नागोरावजी जयरामजी मेटकर स्मृतिप्रित्यर्थ श्री संत गाडगे बाबा सामाजिक कार्य पुरस्कार 2025’’ नामांकनाकरीता आवेदनपत्र हे ठळक अक्षरात लिहावे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर (www.sgbau.ac.in) व्यक्ती गट व संस्था गट अशा दोन पुरस्काराकरीता स्वतंत्र नामांकन आवेदनपत्र विहीत प्रपत्रात देण्यात आले आहे. विद्यापीठाव्दारे संकेतस्थळावर दिलेल्या नामांकन आवेदनपत्रानुसार ए-फोर साईज मधीलच संगणकीय नामांकन आवेदनपत्र स्वीकारण्यात येईल. ज्यांनी यापूर्वी सदर पुरस्काराकरीता विद्यापीठाला अर्ज सादर केले आहेत, त्यांनी यावर्षीच्या पुरस्कारासाठी अर्ज करुन मागील आवेदनपत्राचा विचार करावा, असा विनंतीपर अर्ज सादर करावा. अर्ज सादर करतांना त्यांचा केवळ मागीलवर्षी सादर केलेला अर्जच विचारात घेतला जाईल. त्यांना सदर अर्जासोबत त्यांच्या एका वर्षाच्या सामाजिक कार्याच्या माहितीचा प्रस्ताव नव्याने सादर करावा लागेल. विना प्रपत्र पाठविलेला अर्ज रद्द करण्यात येईल, याची नोंद संबंधितांना घ्यावी. यापूर्वी अनेक मान्यवर व्यक्तींना हा पुरस्कार देवून विद्यापीठाने सन्मानित केले आहे. सन 2025 च्या सामाजिक कार्य पुरस्काराकरीता अर्ज करण्यास इच्छुक व्यक्तींनी वा संस्थांनी www.sgbau.ac.in या विद्यापीठ संकेतस्थळावर ‘अवार्ड अॅन्ड अचिव्हमेन्ट’ यामध्ये ‘कै. नागोरावजी जयरामजी मेटकर स्मृतिप्रित्यर्थ श्री संत गाडगे बाबा सामाजिक कार्य पुरस्कार - 2025’ या लिंकवर विहीत प्रपत्रातील नामांकन आवेदनपत्र व पुरस्काराचे निकष यांची सविस्तर माहिती करून घ्यावी. अधिक माहितीसाठी जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर यांचेशी प्रत्यक्ष वा दूरध्वनी क्रमांक 9011071076 वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधता येईल, असे विद्यापीठाच्यावतीने कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande