अमरावती जिल्हा परिषदेच्या ५९ गटांसाठी आरक्षण जाहीर
अमरावती, 14 ऑक्टोबर (हिं.स.)जिल्ह्याचे मिनीमंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत सदस्य म्हणून निवडून जाण्याचे अनेकांचे स्वप्न धूसर झाले आहे. अमरावती जिल्हा परिषदेच्या ५९ गटांसाठी काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीमुळे अनेक दिग्गजांचे मतदारसंघ गोठले, तर काहीं
जि. प. च्या ५९ गटांसाठी आरक्षण जाहीर  अनेक दिग्गजांना धक्का, सर्कलच बदलणार तर काहींना मिळेल


अमरावती, 14 ऑक्टोबर (हिं.स.)जिल्ह्याचे मिनीमंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत सदस्य म्हणून निवडून जाण्याचे अनेकांचे स्वप्न धूसर झाले आहे. अमरावती जिल्हा परिषदेच्या ५९ गटांसाठी काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीमुळे अनेक दिग्गजांचे मतदारसंघ गोठले, तर काहींना अन्य सर्कलची वाट धरावी लागणार आहे. यासोबतच जिल्ह्यातील १४ पंचायत समित्यांच्या सभापतिपदांसाठी सुद्धा आरक्षण सोडत काढण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात सकाळी साडे दहापासून अपर जिल्हाधिकारी गोविंद दानेज, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) शिवाजी शिंदे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) ज्ञानेश्वर घ्यार आदींच्या उपस्थितीत सोडतीची प्रक्रिया पार पडली. ५९ सदस्यसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेत ३० जागा महिलांसाठी राखीव राहणार आहेत. सोमवारी काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीमध्ये अनेक माजी पदाधिकाऱ्यांनी आपले हक्काचे मतदारसंघ गमावले असून काही मंडळींनी नजीकच्यासर्कलचा विचार सुरू केला आहे.

पंचायत समिती सभापतिपदांचे आरक्षण

पंचायत समिती

: सभापती आरक्षण

१) नांदगाव खंडेश्वर

: अनु. जाती

२) अंजनगाव

: अनु. जाती महिला

३) अमरावती

: अनु. जाती महिला

४) वरुड

: अनु. जमाती

५) चांदूरबाजार

: ना. मा. प्र.

६) दर्यापूर

: ना. मा. प्र

७) धामणगावरेल्वे

: ना. मा. प्र महिला

८) तिवसा

: ना. मा. प्र महिला

९) चांदूररेल्वे

: सर्वसाधारण

१०) अचलपूर

: सर्वसाधारण

११) भातकुली

: सर्वसाधारण महिला

१२) मोर्शी

: सर्वसाधारण महिला

पूर्णतः (अनुसूचित क्षेत्र)

१३) धारणी

: अनु. जमाती,

१४) चिखलदरा

: अनु. जाती महिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande