भाजप नेत्या चाकूरकर यांनी कशिलिंगेश्वर नगर ग्रामपंचायताचा प्रश्न मार्गी लावला
लातूर, 15 ऑक्टोबर (हिं.स.)।भारतीय जनता पक्षाच्या लातूर जिल्ह्यातील नेत्या अर्चना पाटील चाकूरकर यांनी कशिलिंगेश्वर नगर ग्रामपंचायत परिसरास भेट देऊन विविध नागरी समस्यांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.या भेटीदरम्यान परिसरातील नागरिकांनी रस्त्यांची वाईट
अ


लातूर, 15 ऑक्टोबर (हिं.स.)।भारतीय जनता पक्षाच्या लातूर जिल्ह्यातील नेत्या अर्चना पाटील चाकूरकर यांनी कशिलिंगेश्वर नगर ग्रामपंचायत परिसरास भेट देऊन विविध नागरी समस्यांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.या भेटीदरम्यान परिसरातील नागरिकांनी रस्त्यांची वाईट अवस्था, वीज व स्वच्छतेच्या अडचणी, साचलेला कचरा तसेच ग्रीनबेल्ट क्षेत्रातील दुर्लक्ष अशा अनेक मूलभूत समस्यांबाबत आपली व्यथा व्यक्त केली.

या सर्व तक्रारींनंतर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना या समस्या लक्षात आणून देताच प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करत स्वच्छतेच्या कामांना प्रारंभ केला आहे.नाल्यांची सफाई, रस्त्यांवर मुरूम टाकणे, झालेला सर्व कचरा उचलणे तसेच इतर आवश्यक कामांना गती मिळाली आहे.जनतेच्या अडचणींवर तातडीने प्रतिसाद देऊन उपाययोजना केल्याबद्दल प्रशासनाचे मनःपूर्वक आभार त्यांनी व्यक्त केले आहेत

--------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande