लातूर, 15 ऑक्टोबर (हिं.स.)। लातूर जिल्ह्यातील अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी गोंदियाचं पालकमंत्री पद सोडलं आहे. तब्येतीचेकारण देत त्यांनी पालकमंत्री पद सोडले आहे.
विशेष म्हणजे अलीकडेच शेतकऱ्यांच्या संदर्भात त्यांनी वादग्रस्त विधान केले होते. अजित पवार यांची वरळी येथे पार पडलेल्या जिल्हाध्याकक्षांच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली आहे. तब्येतीचे कारण देत त्यांनी पालकमंत्री पद सोडले आहे. पालकमंत्री पद मिळवण्यासाठी अनेक जण आग्रही असतात, मात्र बाबासाहेब पाटील यांनी पालकमंत्री पद सोडलं आहे. काही दिवसांपूर्वीच बाबासाहेब पाटील यांच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं आहे. त्यांना सातत्याने पायाचा प्रॉब्लेम येत असल्यामुळे लांबचा प्रवास होत नाही असं कारण त्यांनी दिलं आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis