लातूर, 15 ऑक्टोबर (हिं.स.)। निलंगा मतदारसंघातील औराद शहाजनी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत नवीन शेतकरी भवन उभारण्यासाठी 1 कोटी 52 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. निलंगा विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी ही माहिती दिली आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सतत पाठपुरावा केल्यानंतर हा निधी मिळाला आहे.निधी मंजूर केल्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत.निलंगा विधानसभा मतदारसंघात विकासात्मक कामांसाठी आपण राज्य शासनाकडे पाठपुरावा केला आणि शेतकऱ्यांना शेतकरी भवन मिळाले आहे. अशा शब्दात निलंगेकर यांनी सरकारचे आभार मानले.
------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis