बीड, 15 ऑक्टोबर, (हिं.स.)। परळी तालुक्यातील नागापूर गावामध्ये परळी न्यायालयाचे मोबाईल व्हॅनद्वारे कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न झाले. या कार्यक्रमास परळी न्यायालयाचे न्यायाधीश बोर्डे न्यायाधीश रायरीकर उपस्थित होते.
भारतीय संविधानाने नागरिकांना दिलेले अधिकार व नागरिकांचे संरक्षण तसेच कायद्याची अधिकाधिक जनजागृती करण्याच्या प्रमुख उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास न्यायाधीशांसह परळी वकील संघाचे अध्यक्ष सर्व सदस्य न्यायालयाचे कर्मचारी, पोलीस बांधव यासह गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागापूर आणि परिसरातील नागरिकांना कायद्याची अधिकाधिक माहिती व्हावी यासाठी जनजागृती अभियान संपन्न झाले गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात या जनजागृती अभियानामध्ये सहभाग नोंदवला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis