लातूर, 15 ऑक्टोबर (हिं.स.) : लातूर जिल्ह्यातील श्री सिद्धेश्वर देवस्थानच्यावतीने अतिवृष्टीबाधीतांसाठी 25 लाखाचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी जिल्हाधिकार्यांच्या मार्फत धनादेश देण्यात आला आहे सामाजीक बांधीलकी जोपासत लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या वतीने अतिवृष्टीबांधीतांच्या मदतीसाठी 25 लाखाचा निधी देण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात आला आहे सदर निधीचा धनादेश जिल्हाधिकारी वर्षा घुगे-ठाकूर यांच्याकडे देवस्थानचे जेष्ठ विश्वस्त तथा माजी नगराध्यक्ष विक्रम गोजमगुंडे व प्रशासक सचिन जांबुतकर यांच्या हस्ते देण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis