छ. संभाजीनगर - वैजापुरात काँग्रेसच्या संघटनात्मक तयारीवर बैठकीत जोर
छत्रपती संभाजीनगर, 15 ऑक्टोबर (हिं.स.)वैजापूर तालुका व शहर काँग्रेस कमिटीची आढावा बैठक गांधी भवन येथील काँग्रेस संपर्क कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीस छत्रपती संभाजीनग जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्री किरण पाटील डोणगावकर तसेच वैजापूर-गंग
अ


छत्रपती संभाजीनगर, 15 ऑक्टोबर (हिं.स.)वैजापूर तालुका व शहर काँग्रेस कमिटीची आढावा बैठक गांधी भवन येथील काँग्रेस संपर्क कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीस छत्रपती संभाजीनग जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्री किरण पाटील डोणगावकर तसेच वैजापूर-गंगापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी श्री गुणवंत होळकर प्रमुख उपस्थित होते.

बैठकीदरम्यान श्री किरण पाटील डोणगावकर यांनी संघटन बळकटीकरण, कार्यकर्त्यांशी समन्वय आणि पक्षाची भूमिका प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी वैजापूर तालुक्यात अंदाजे २५,००० बोगस मतदान उघडकीस आल्याचे सांगितले तसेच वैजापूर तालुक्यातील बूथनिहाय मतदार याद्यांमधील दुबार नावे वगळण्यासाठी होणाऱ्या पुढील कार्यवाहीवर चर्चा करण्यात आली.

या बैठकीस काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी, तालुका व शहर अध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष, युवक काँग्रेस, एनएसयूआय, सेवादल आदी सर्व आघाड्यांतील काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.प्रमोद दादा जगताप, आर. डी. थोट राहुल संत, सुनील बोडखे, अशोक काका राहणे, डॉ. नितेश शहा, मधुकर साळुंके, सिद्दीकी शेख, प्रदीप जाधव उपस्थित होतेबैठकीत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक तयारी, कार्यकर्त्यांची जबाबदारी आणि स्थानिक जनतेशी संपर्क यावर सखोल चर्चा करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande