जळकोट : अत्याधुनिक शेतकरी भवनाला मंजूर
लातूर, 16 ऑक्टोबर, (हिं.स.)। राज्याचे पणनमंत्री जयकुमार रावळ व माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांच्या माध्यमातून जळकोट कृषि उत्पन्न बाजार समितीसाठी अत्याधुनिक शेतकरी भवन मंजूर झाले . लवकरच या भवनाचे बांधकाम कार्य सुरू होणार आहे. या निर्णयामुळे शेतकरी
जळकोट : अत्याधुनिक शेतकरी भवनाला मंजूर


लातूर, 16 ऑक्टोबर, (हिं.स.)।

राज्याचे पणनमंत्री जयकुमार रावळ व माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांच्या माध्यमातून जळकोट कृषि उत्पन्न बाजार समितीसाठी अत्याधुनिक शेतकरी भवन मंजूर झाले .

लवकरच या भवनाचे बांधकाम कार्य सुरू होणार आहे. या निर्णयामुळे शेतकरी वर्गासाठी सभा, प्रशिक्षण कृषी प्रदर्शन व विविध उपक्रमांसाठी स्वतंत्र केंद्र उपलब्ध होणार असून याचा फायदा तालुक्यातील शेतक-यांना होणार आहे अशी माहिती बाजार समितीचे सभापती विठ्ठल चव्हाण यांनी दिली

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन या योजनेतर्गत जळकोट कृषी उत्पन्न बाजार समिती असलेल्या ठिकाणी शेतकरी बांधवांना मुक्कामाची सोय व्हावी, तसेच शेतक-यांच्या मूलभूत सुविधाही त्याच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात, या दृष्टीने ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी भवन उपलब्ध नाही तेथे नवीन शेतकरी भवन बांधणे, तसेच ज्या बाजार समितीच्या परिसरात शेतकरी भवन अस्तीत्वात आहे परंतु सुस्थितीत नाही अशा शेतकरी भवनाची दुरुस्ती करणे यासाठी शासन अनुदान उपलब्ध करुन देण्यारा संदर्भ क्र. ४ येथील दि.१९ डिसेंबर २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्चये मान्यता देण्यात आली आहे.

सदर योजनेंतर्गत उपसंचालक (पणन), पणन संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी संदर्भक्र.५ येथील पत्रान्चये सादर केलेल्या कृषि उत्पन्न बाजार समिती, जळकोट, जि. लातूर येथे नवीन शेतकरी भवन बांधण्याच्या एकूण १,५२.६९.६५१ रुपये इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

अखेर जळकोट येथे कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात उभारण्यात येणा-या शेतकरी भावनसाठी शासनाने एक कोटी ५२ लाख रुपयाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिली आहे, अशी माहितीही सभापती विठ्ठल चव्हाण यांनी दिली .

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande