छत्रपती संभाजीनगर, 16 ऑक्टोबर, (हिं.स.) - भाजपा राष्ट्रीय महामंत्री आत्मनिर्भर भारत संकल्प अभियानाचे राष्ट्रीय प्रमुख खासदार अरुण सिंग हे आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत मेळाव्यासाठी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आले.आगामी काळात येणाऱ्या निवडणुका पक्ष अभियान, आत्मनिर्भर भारत संकल्प, पदवीधर नोंदणी विषयावर सखोल चर्चा झाली.भाजपा प्रदेश महामंत्री आमदार संजय केणेकर यांनी खासदार डॉ भागवत कराड यांच्या निवासस्थानी स्वागत केले.
यावेळी विभागीय संघटन मंत्री श्री संजय कौडगे, शहराध्यक्ष श्री किशोर शितोळे, श्री बापू घडामोडे, श्री समीर राजुरकर, श्री हर्षवर्धन कराड, श्री धनंजय कुलकर्णी, उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis