बीड, 16 ऑक्टोबर, (हिं.स.)। आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज बीड येथे बीड शहर व तालुका काँग्रेस पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक जिल्हाध्यक्ष राहुल भैय्या सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्ताने विविध पक्षांच्या वतीने बैठका आणि मेळाव्याचे सत्र सुरू आहे यामध्ये काँग्रेस पक्षाने देखील आज बैठकीचे आयोजन केले होते.
यावेळी या बैठकीस काँग्रेसचे बीड विधानसभा निरीक्षक अन्वर देशमुख,प्रदेश सरचिटणीस दादासाहेब मुंडे,जिल्हा उपाध्यक्ष प्रवीणकुमार शेप विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अविनाश डरफे, तालुका अध्यक्ष गणेश बजगुडे पाटील,शहर अध्यक्ष परवेझ खुरेशी युवा नेते आकाश मस्के पा यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते बैठकीस उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis