लातूर : नेत्रहिन विद्यार्थ्यांसोबत अनोख्या पद्धतीने दिवाळी
लातूर, 16 ऑक्टोबर (हिं.स.) : व्यवस्थापन शास्त्र संकुल, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र, लातूर यांच्या विद्यार्थ्यांनी बुधोडा येथील स्वाधार आश्रमातील अंध विद्यार्थ्यांसोबत अनोख्या पद्धतीने दिवाळी फराळ दिवस साजरा केला. अंध विद्यार
अ


लातूर, 16 ऑक्टोबर (हिं.स.) : व्यवस्थापन शास्त्र संकुल, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र, लातूर यांच्या विद्यार्थ्यांनी बुधोडा येथील स्वाधार आश्रमातील अंध विद्यार्थ्यांसोबत अनोख्या पद्धतीने दिवाळी फराळ दिवस साजरा केला.

अंध विद्यार्थ्यांना भूकंप, आग आणि वीज पडणे यांसारख्या आपत्तींच्या प्रसंगी स्वतःचे संरक्षण कसे करावे, याचे प्रशिक्षण डॉ. प्रमोद पाटील यांनी दिले.

कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी अंध मित्रांसोबत दीपावलीचा फराळ करून आनंद वाटला.“दृष्टी नसली तरी उर्वरित इंद्रियांच्या आधारे अंध व्यक्ती आपत्तीला समर्थपणे सामोरे जातात,”असे यावेळी डॉ. प्रमोद पाटील यांनी प्रतिपादन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande