सोलापूर, 16 ऑक्टोबर, (हिं.स.) - शहरातील गाडेगाव रस्त्यावर असलेल्या गोदामास वीजवितरण कंपनीच्या तारा तुटून गोदामावर पडल्याने शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत सुमारे १२ लाखांचे साहित्य जळून खाक झाले. बार्शी शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. अमर गजघाटे यांनी पोलिसांत माहिती दिली. ही घटना ४२२ गाडेगाव रोड गट नं १०८३/३/३, १०८३/४/६ येथे बुधवारी रात्री सव्वा बारा वाजता घडली.
साईराजानगर येथे स्क्रॅप खरेदी विक्रीचे गोदाम असून, पाच कामगार आहेत सुट्टी असल्याने एकट्याने रात्री साठे आठ वाजता गोदाम बंद करून घरी गेलो, त्यावेळी रात्री सव्वा बारा वाजता गोदामाशेजारी राहणाऱ्या कुलदीप विश्वेश्वर यांनी आग लागली असल्याची माहिती दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड