परभणी, 16 ऑक्टोबर (हिं.स.)।
सैनिक कल्याण विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील लिपिक-टंकलेखक (गट-क) एकूण 72 पदाकरिता माजी सैनिक उमेदवारांकडून 5 नोव्हेंबर,2025 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अनुराधा ढालकरी यांनी दिली आहे.
72 पदांपैकी 01 पद हे अपंग संवर्गातून किमान 40 टक्के अपंगत्व असलेल्या उमेदवारामधून दिव्यांगत्वाच्या प्रकारांनुसार कर्तव्ये व जबाबदारीचा विचार करुन गुणवत्ता / उपलब्धतेनुसार भरण्यात येईल. भरती प्रक्रिया टिसीएस-आयओएन यांचे मार्फत होणार आहे. परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.
पात्र उमेदवाराना ऑनलाईन अर्ज https://mahasainik.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उमेदवार भरती येथे 14 ऑक्टोबर, 2025 पासून 5 नोव्हेंबर, 2025 रोजी संध्याकाळी 23.59 वाजेपर्यंत सादर करणे आवश्यक राहील. त्यानंतर वेबलिंक बंद होईल. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, परभणी येथे संपर्क करावा असेही आवाहनही त्यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis