आपत्ती वेळी त्वरित मदत हीच खरी देशसेवा- प्रा. डॉ. जयपाल पाटील
रायगड, 16 ऑक्टोबर (हिं.स.)। “आपल्या गावात, रस्त्यावर किंवा परिसरात कोणतीही आपत्ती आल्यास त्वरित मदत करणे आणि जीव वाचविणे ही खरी देशसेवा आहे. त्यामुळे पोलीस दलात किंवा इतर शासकीय सेवेत दाखल होऊन देशसेवेची संधी साधा,” असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन तज
आपत्ती वेळी त्वरित मदत हीच खरी देशसेवा — प्रा. डॉ. जयपाल पाटील


रायगड, 16 ऑक्टोबर (हिं.स.)।

“आपल्या गावात, रस्त्यावर किंवा परिसरात कोणतीही आपत्ती आल्यास त्वरित मदत करणे आणि जीव वाचविणे ही खरी देशसेवा आहे. त्यामुळे पोलीस दलात किंवा इतर शासकीय सेवेत दाखल होऊन देशसेवेची संधी साधा,” असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन तज्ञ प्रा. डॉ. जयपाल पाटील यांनी केले.

मेरा युवा भारत, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय (भारत सरकार), रायगड अलिबाग, प्रिझम सामाजिक विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच रायगडचा युवक फाउंडेशन आणि स्पर्धा विश्व अकॅडमी अलिबाग यांच्या सहकार्याने जागतिक आपत्ती दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन स्पर्धा विश्व अकॅडमी येथे करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. जयपाल पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. श्याम जोगळेकर, प्रिझम संस्थेच्या अध्यक्षा व राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तपस्वी गोंधळी, तसेच स्पर्धा विश्व अकॅडमीच्या संचालिका सुचिता साळवी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे मार्गदर्शन मेरा युवा भारतचे युवा अधिकारी अमित पुंडे यांनी केले.

तपस्वी गोंधळी यांनी प्रास्ताविकात सांगितले की, “आपत्ती कधी येईल सांगता येत नाही. मात्र सज्जता आणि माहिती असली की जीव वाचवता येतो.” यानंतर संविधान वाचन, “दामिनी” अ‍ॅपची माहिती, वाहन परवाना व दंड नियम, तसेच “१०८” रुग्णवाहिका सेवेचे प्रात्यक्षिक याचे सादरीकरण करण्यात आले.

रुग्णवाहिकेचे प्रात्यक्षिक रायगडचे उपप्रमुख अजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. जयप्रकाश पांडे आणि पायलट सुशांत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडले. प्रा. श्याम जोगळेकर यांनी विद्यार्थ्यांना प्रामाणिक सेवा करण्याचे व कोणत्याही प्रलोभनास बळी न पडण्याचे आवाहन केले. शेवटी डॉ. जयपाल पाटील यांनी आपल्या “लाडू” या कवितेने कार्यक्रमाला सुंदर समारोप दिला. कार्यक्रमाचे आभार स्पर्धा विश्व अकॅडमीच्या संचालिका सुचिता साळवी यांनी मानले.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande