नांदेडमध्ये शरद पवार गट स्वतंत्र निवडणुका लढवण्याच्या तयारीत
नांदेड, 16 ऑक्टोबर (हिं.स.)। नांदेड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भात राष्ट्रवादीने वेगळा पवित्रा घेतला असल्याचे दिसत आहे. आज नांदेड येथे राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये तसा सूर पाहावयास मिळाला. महाविकास आघाडीच्या ऐवजी स्व
अ


नांदेड, 16 ऑक्टोबर (हिं.स.)।

नांदेड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भात राष्ट्रवादीने वेगळा पवित्रा घेतला असल्याचे दिसत आहे. आज नांदेड येथे राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये तसा सूर पाहावयास मिळाला.

महाविकास आघाडीच्या ऐवजी स्वतंत्र निवडणुका लढविण्याचा निर्धार अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या बैठकीत केला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात आज राष्ट्रवादी कॉंग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाची बैठक संपन्न झाली.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री सुर्यकांताताई पाटील होत्या. समवेत माजी मंत्री माधवराव पाटील किन्हाळकर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ.सुनिल कदम , ग्रामीण जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या बेबीताई नाईक आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande