अमरावती, 16 ऑक्टोबर (हिं.स.)
श्री विठ्ठलानंद सरस्वती फिरते वाचनालय, दस्तुर नगर सेवा समिती, विदर्भ मल्लखांब असोसिएशन, महाराष्ट्र राज्य विद्यार्थी कल्याण शिक्षक पालक संघ व वचनप्रेमी संघ, राजापेठ स्पोटिंग क्लब व श्री गणेश मंदिर संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कल्पक किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेसाठी छत्रपती संभाजी गट (वय ५ ते १५ वर्ष); छत्रपतीशिवाजी गट (वय १६ ते वरील) असे २ विभाग आहेत. विद्यार्थी गटात किल्ले बनवण्यासाठी प्रत्येकी ४ विद्यार्थी राहू शकतात, वयोमयदि नुसार स्पर्धेच्या ठिकाणी २ गट राहतील, स्पर्धेच्या गटाकरिता एकचशाळा कॉलेज किंवा परिसराचे स्पर्धक असणे बंधनकारक नाही, आयोजकांकडून ५ बाय ५ फूट जागा तसेच माती व पाणी उपलब्ध करून दिली जाईल, अन्य किल्ल्याकरिता लागणारे साहित्य स्पर्धकांना आणावे लागेल. दि. १७ ऑक्टोबर रोजी सायं. ५ वाजता जागा वाटप केली जाईल, १८ ऑक्टोबरला सकाळी ७:३०० वाजता किल्लेबांधण्यास प्रारंभहोईल व १९ ऑक्टोबर रोजी ३ वाजेपर्यंत किल्लेपूर्ण करणे आवश्यकं असेल. त्या नंतर ३ वाजता परीक्षण होऊन समारोपिय व बक्षीस वितरण कार्यक्रम होईल.
या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन आयोजक सुनील पांडे, शाम ढोले, विनोद वैद्य, सुनील भालेराव, विजय देवळे, प्रवीण कौडण्य, अमोल ठाकरे, सुनील देशमुख, सुधीर देशमुख, नंदू जोशी, दिनेश पांडे, राजाभाऊ गयाळ, हितेंद्र सिसोदिया, मीनाक्षी भालेराव, सुजाता पांडे, ललिता ढोले, क्षमा वैद्य, आशा देशमुख यांनी केले आहे. स्पर्धेचे स्थळः अंबिकानगर म.न.पा. शाळा १६ च्या मैदानावर, श्री गणेश मंदिर संस्थानअंबिका नगर जवळ, कवरनगर हे आहे. दोन्ही गटासाठीप्रथम पुरस्कार २००१ रुपये, द्वितीय पुरस्कार १२०१ रुपये, तृतीय पुरस्कार ७०१ रुपये तसेच प्रोत्साहन पुरस्कार ३०१ रुपये देण्यात येईल. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्रे देण्यात येईल. अधिक माहितीसाठी अनुराधा सुनील पांडे ९४०३३५५३३१; सुनील पांडे ९३७२७९१९४३; प्रथमेश सिंग ९६२३४१३३२२; रक्षित खानिवाले ८७२६५६६९५२ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी