छत्रपती संभाजीनगर, 16 ऑक्टोबर (हिं.स.)।
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डाॅ. विजय फुलारी यांची पैठण येथील संतपीठाच्या संदर्भात भेट घेतली. भविष्यातील संतपीठाचे स्वरुप, नियोजन व वाटचाल याबाबत सविस्तर चर्चा केली.
पुढील काळात संतपीठाचा विकास व नावलौकिक वाढेल यादृष्टीने आगामी काळात पाऊले उचलली जातील. याकामी विद्यापीठाचे सर्व सहकार्य राहील असे कुलगुरू यांनी सांगितले. शासनस्तरावर यासाठी सातत्याने पाठपुरावा करून पैठणच्या संतपीठाचा चेहरा बदलण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचा आमदार भुमरे यांनी विश्वास दिला.
या प्रसंगी उप कुलगुरू प्रा. डाॅ. लवाल्मिक सरवदे, कुलसचिव डाॅ. प्रशांत अमृतकर, देवगिरी महांनदचे माजी अध्यक्ष नंदलाल काळे, देवगिरी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. गणेश मोहिते उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis