छत्रपती संभाजीनगर, 16 ऑक्टोबर, (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघातील वॉर्ड क्र. १३ आणि ५० मधील भीमनगर उत्तर अंतर्गत लालमाती, निसर्ग कॉलनी तसेच कोतवालपुरा परिसरातील बारापुल्ला गेटजवळ सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन आणि कमलनगर येथील नव्या रस्त्याचे लोकार्पण सोहळा शिवसेना आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या हस्ते संपन्न झाला.
सुमारे १ कोटी २० लाख रुपयांच्या निधीतून या रस्त्यांची उभारणी करण्यात येणार असून, या माध्यमातून परिसरातील नागरिकांना सुखकर व सुरक्षित प्रवासाचा लाभ होणार आहे.
या प्रसंगी , “नागरिकांच्या सोयीसाठी आणि परिसरातील सर्वांगीण विकासासाठी ही रस्ते कामे हाती घेण्यात आली आहेत. नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी लक्षात घेऊन दर्जेदार सिमेंट काँक्रीट रस्ते उभारण्याचे काम प्राधान्याने सुरू आहे.”असे उपस्थित नागरिकांना संबोधित केले.
यावेळी शहरप्रमुख विश्वनाथ राजपूत, विभागप्रमुख बाबा तायडे, महिला आघाडीच्या संपर्कसंघटक प्रतिभा जगताप, उपशहरसंघटक सुजाता गवळी, उपशहरसंघटक माधुरी लहरे, युवासेना महानगरप्रमुख सागर करडक, युवासेना उपजिल्हाप्रमुख राहुल देवगिरीकर, युवासेना उपशहरप्रमुख स्मिथ ओलीव्हर यांच्यासह शिवसेना-युवासेना पदाधिकारी तसेच परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis