बीड, 16 ऑक्टोबर, (हिं.स.)। माजलगाव विधानसभा अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोशल मीडिया उपाध्यक्ष पदी विशाल चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. या संदर्भात अधिकृत माहिती देण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यांची भूमिका सोशल मीडियाद्वारे मांडली जाणार आहे.
पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आणि डिजिटल माध्यमातून विचार पोहोचवण्यासाठी श्री. चव्हाण नक्कीच उत्साहाने कार्य करतील, असा विश्वास आहे असे राजेंद्र मस्के जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष), बीड यांनी सांगितले.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis